सोलापूर - राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे दिनांक 16 मे 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून ,त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
शुक्रवार दिनांक 16 मे 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे जिल्हा नियोजन समिती पुर्वतयारी आढावा बैठकीस उपस्थिती, सकाळी 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथून स्वातंत्रवीर सावरकर पुतळा, सोलापूरकडे प्रयाण, सकाळी 10.10 वाजता स्वातंत्रवीर सावरकर पुतळा येथे आगमन व तिरंगा पदयात्रेस उपस्थिती, सकाळी 11.00 वाजता माधवनगर, पद्यामारुती मंदिर पटांगण येथून शासकीय विश्रामगृह, सोलापूरकडे प्रयाण, सकाळी 11.10 वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव, सकाळी 11.55 वाजता शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूरकडे प्रयाण, दुपारी 12.00 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व जिल्हा नियोजन समिती सभेस उपस्थिती, दुपारी 2.00 वाजता टंचाई आढावा बैठकीस उपस्थिती, दुपारी 3.00 वाजता खरीप हंगाम-2025 नियोजन बैठकीस उपस्थिती, दुपारी 3.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, दुपारी 3.50 ते 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव, दुपारी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरकडे प्रयाण, दुपारी 4.40 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ येथे आगमन व नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचा आढावा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक कामाचा आढावा, सायंकाळी 5.10 वाजता सोलापूर येथून सांगोलाकडे प्रयाण, सायंकाळी 6.00 वाजता सांगोला येथे आगमन व भारतीय जनता पार्टी नूतन जिल्हाध्यक्ष पदग्रहण व सत्कार समारंभास उपस्थिती, सायंकाळी 7.30 वाजता सांगोला येथून मोटारीने माळशिरस, फलटण, शिरवळ मार्गे पुणेकडे प्रयाण करतील.